पुणे विभागात अन्नधान्याची मुबलक प्रमाणात आवक

पुणे, दि. १२ मे २०२०: सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ३३,२७३ क्विंटल अन्नधान्याची तर ८,१०९ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात ४,३९७ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक १८,८६९ क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात ९९.०९५ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २४.१३३ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे विभागात १९,६८२ स्थलांतरित मजूरांची सोय करण्यात आली आहे त्यातील ९०,६६८ मजुरांना रोज भोजन देण्यात येत आहे. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजूरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १३६ कॅम्प उभारण्यात आले आहेत. कामगार विभागामार्फत ६८ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत १८ कॅम्प असे पुणे विभागात एकूण २२२ रिलीफ कॅम्प उभारले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा