विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अभाविप चे आंदोलन

5
पुणे, १२ डिसेंबर २०२१ : आज म्हाडाच्या विविध पदांकरिता होत असलेल्या परिक्षा गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अचानक रद्द केल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या या अन्यायाचा विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने आज दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता निषेध व्यक्त करण्यात आला.
म्हाडाच्या विविध पदांकरिता आज दिनांक १२ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात परिक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री ०२  वाजता ऑनलाईन पद्धतीने या परिक्षा रद्द करण्याची घोषणा केली. या परिक्षेची तयारी करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी एस टी महामंडळाच्या संपा च्या प्रश्नावर तोडगा काढून प्रवास करून आपापल्या परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत होते. आणि अशाप्रकारे ऐनवेळी या परिक्षा रद्द करून शासन ठरवून विद्यार्थ्यांचे आर्थिक, शैक्षणिक, व मानसिक नुकसान करत आहे का? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर निर्माण झाला आहे.
आयोजित परिक्षा अचानक रद्द करून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मानसिक आर्थिक शारीरिक सर्व प्रकारचे नुकसान झाले. विद्यार्थ्यांवर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने आज सकाळी ११   वाजता अहिल्या अभ्यासिका, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे येथे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अभाविप नेहमी त्यांच्या सोबत उभे राहिल, असा विश्वास अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा