अदानींनी खरेदी केल्या ACC आणि Ambuja Cement कंपन्या, इतक्या कोटींत करणार टेक ओव्हर

नवी दिल्ली, 16 मे 2022: उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे ‘सिमेंट किंग’ होणार आहेत. त्यांच्या अदानी समूहाने एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट या देशातील दोन मोठ्या सिमेंट कंपन्या विकत घेतल्या आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी कुटुंबाने एक स्पेशल ऑफशोर कंपनी (SPV) बनवून ACC आणि Ambuja Cement मध्ये स्वित्झर्लंडची सीमेंट कंपनी Holcim Ltd. मध्ये हिस्सेदारी विकत घेतली आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये निश्चित करार (Definitive Agreement) झाला असून यासोबतच अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातही उतरणार आहे.

एवढी आहे Holcimची हिस्सेदारी

Holcim आणि त्याच्या उपकंपन्यांचा अंबुजा सिमेंटमध्ये 63.19% आणि ACC मध्ये 54.53% हिस्सा आहे. ACC सिमेंटमधील 54.53% स्टेकपैकी, 50.05% स्टेक अंबुजा सिमेंट मार्फत विकत घेतला होता.

$10.5 अब्ज करार

अदानी समूहाने दोन्ही कंपन्यांमधील होल्सीमच्या स्टेकसाठी $10.5 बिलियन (सुमारे 81,360 कोटी रुपये) चा करार केला आहे. पायाभूत सुविधा आणि साहित्य क्षेत्रातील हा देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.

अदानी बनले सिमेंट किंग

Holcim ग्रुपच्या कंपन्या गेल्या 17 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहेत. कंपनीचे भारतात तीन मोठे ब्रँड आहेत, ज्यात अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड आणि मायसेम यांचा समावेश आहे. हॉल्सिम ही सध्या अल्ट्राटेक सिमेंट नंतर भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. अंबुजा सिमेंट आणि ACC लिमिटेड यांची एकत्रित क्षमता वार्षिक 66 मिलियन टन आहे.

अदानी समूहाच्या या दोन सिमेंट कंपन्या विकत घेतल्यानंतर ती भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत एका झटक्यात नंबर-2 सिमेंट कंपनी बनली आहे. अंबुजा सिमेंटचे देशात 6 सिमेंट प्लांट आहेत. तर 8 सिमेंट ग्राइंडिंग युनिट आहेत. एकट्या अंबुजा सिमेंटची वार्षिक उत्पादन क्षमता 3.1 कोटी टन आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा