बीजिंग, ८ जानेवारी २०२३ : चीनच्या जिआंगशी प्रांतात रविवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या रस्ता अपघातात १७ जण ठार, तर अनेकजण जखमी झाले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, जिआंगशी प्रांतातील नानचांग काउंटीमध्ये स्थानिक वेळेनुसार, पहाटे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे.
दरम्यान, चीनमध्ये गेल्या महिन्यात धुक्यामुळे शेकडो वाहने एकमेकांवर आदळली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. तर, सप्टेंबरमध्ये नैऋत्य चीनच्या गुइझोउ प्रांतात एका मोटरवेवर बस उलटून २७ प्रवासी ठार झाले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.