अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा धुळखेड जवळ अपघात

सोलापुर, २७ ऑक्टोबर २०२२ : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या गाडीचा आणि उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला.

या अपघातात भाविक प्रवास करत असलेल्या गाडीतील दोन जन ठार झाले आहेत. तर पंधरा भाविक जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सदर घटना कर्नाटकातील धुळखेड सीमेवर पहाटेच्या सुमारास घडली आहे. अपघातातील जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा