अहमदनगर-कल्याण महामार्गावर अपघात, तीन परप्रांतीय मंजूरांचा जागीच मृत्यू

आळेफाटा, ८ जून २०२३ : नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्या शिवारात चौगुले वस्तीजवळ मोटरसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकल वरील तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना काल मध्यरात्री घडली आहे. हे अपघातग्रस्त परप्रांतीय असून, आळेफाटा येथे एका बेकरीत कामानिमित्त आलेले होते.

यात एका अल्पवयीन मंजूरांचा समावेश आहे. अपघातातील मृतांची नावे योगेश रामकुमार (वय २१) चाहात सहानी (वय १७) आणि संजीव कुमार (वय २४) सर्व राहणार उत्तरप्रदेश या राज्यातील आहेत. याबाबत आळेफाटा पोलिसांनी सांगितले की, आळेफाटा येथे असलेल्या एका बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते.

रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स बसने (एमएच ०४ एचवाय ८७३०) दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागेवरच मरण पावले. अपघातांची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि तिघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. टेम्पो ट्रॅव्हल्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा