चाकण-तळेगाव रस्त्यावर अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे 22 ऑगस्ट 2022 अति घाई संकटात नेई या म्हणीचा प्रत्यय चाकण तळेगाव रस्त्यावर आला. परंतु दैव बलवत्तर म्हणून दूचाकी स्वार बचावला. गाडी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्वार कारला धडकून ही घटना घडली.

दुचाकी चालक बाळू शिळवणे हे आपल्या स्प्लेंडर गाडीवर भरधाव वेगाने चाकण-तळेगावया रस्त्याने चालले होते. त्यांच्या पुढे एक कंटेनर चालला होता, त्याला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात शिळवणे यांनी गाडी सुसाटपणे चालवुन ओव्हरटेक केला. परंतु त्याच वेळी समोरून अचानक एक भरधाव कार आली. अचानक कार समोर आल्याने शिळवणे यांनी कार आणि कंटेरनरच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य झाले नाही आणि गाडी कारला धडकली.

सदर घटना ही पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घडली आहे. तळेगाव-चाकण महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघाताचे दृश्य कार च्या समोरील कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकी स्वारावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकी गाडी चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा