मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; १३ वाहनांचे नुकसान

खोपोली, २७ एप्रिल २०२३ : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज सकाळी खोपोली एक्झिट जवळ १३ वाहने एकमेकांवर आदळली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये कार, ट्रक यांचा समावेश असून यामधील वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही जण किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने खोपोली येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील खोपोली जवळील एक्झिट जवळ अपघात झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, आयआरबीची टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी तातडीने दाखल होत मदतकार्य सुरू केले. अनेक वाहनांचे या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. एक्स्प्रेसवे दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला होता. त्यादरम्यान, काही गाड्यांचे ब्रेक फेल झाले आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये दोन ट्रक आणि ११ गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा