राज्य राखीव दलाच्या गाडीला अपघात

26

इंदापूर (प्रतिनिधी):  राज्य राखीव दलाच्या गाडीला अपघात अपघात झाला आहे. मागचे टायर फुटल्याने बस उलटली आहे. इंदापूर जवळील बिजवडी येथे ही घटना घडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. यावेळी काही जवान किरकोळ जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

राज्य राखीव दल बल गट क्रमांक १० सोलापूरची ही गाडी आहे. सोलापूरहून दौंडकडे फायरिंग करण्यासाठी हे दल चालले होते. मात्र इंदापूरच्या नजिक बिजवडीच्या अगदी पुलाजवळच येताच गाडीचा मागील डावा टायर फुटल्याने ही बस उलटून अपघात झाला.

आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एम.एच.१३ पी.ओ.४३७ क्रमांकाची ही बस आहे. गाडीचे चालक यु.आर. सातव यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात तर एस.पी.चव्हाण यांना डाॅ.मगर यांच्या रूग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी इंदापूर महामार्ग पोलीस ए.एस.आय.जाधव, आहेर, मदने व वाघ यांसह सरडेवाडी टोल प्रशासन घटनास्थळी धावून आले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा