जालना, 14 एप्रिल 2022: आपल्या अनोख्या अंदाजानं प्रबोधन करणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या गाडीला काल रात्री अपघात झाला. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र या अपघातात त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. काल बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली. जालना जिल्ह्यातील परतूर येथे हा अपघात झाला. जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका लाकडं वाहून नेत असणाऱ्या ट्रॅक्टरला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ आदळली. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली आहे. इंदुरीकर महाराजांना कोणतीही इजा न झाल्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास घेतला.
इंदुरीकर महाराज अनेक वेळा आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत राहिले आहे. काही संघटनांनी त्यांच्या विरोधात एफआयआर देखील नोंदवला होता. आपल्या अनोख्या शैलीत प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या समर्थकांमध्ये प्रसिद्ध आहेत. काही काळापूर्वी संततीप्राप्ती वरून त्यांनी केलेल्या विधानांमुळं ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे