बुलढाणा, ३ नोव्हेंबर २०२२: बुलढाणा शहरात एक अपघात झाला आहे. पत्नीला कार चालवणे शिकवत असताना गाडीवरचे नियंत्रन सुटले आणि कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहरीत जाऊन पडली, या अपघातात पत्नी व मुलीचा मृत्यु झाला असून पतीला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहणारे शिक्षक अमोल मुरकुट हे पत्नीला स्वाती मुरकुट यांना कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिध्दी मुरकुट ही सुध्दा यांच्या सोबत कारमध्ये होती. कार चालवत असताना चिखली रोडवर आले तेव्हा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट ७० फुट खोल विहीरीत जाऊन पडली.
या झालेल्या अपघातात अमोल मुरकुट हे गाडीच्या खिडकीमधून कसेबसे बाहेर आले, मात्र त्यांची पत्नी स्वाती मुरकुट आणि मुलगी सिध्दी मुरकुट याचा पाण्यामध्ये मृत्यु झाला. स्थानिक नागरिकांनी अमोल मुरकुट यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले असून मृतदेहाचा शोध घेत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर