महिलेचा अपघाती मृत्यू, केले अवयव दान, दिले तिघांना जीवदान

कोल्हापुर, १ सप्टेबंर २०२२: सांगरुळ येथील महिलेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यु झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिचे यकृत व किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बुधवारी कोल्हापुर ते पुणे ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. या कॉरिडोरमधून महिलेचे यकृत व किडनी रुग्णवाहिकेतून नेत असताना राष्ट्रीय महामार्गावर किकवी येथे टायर फुटून अपघात झाला. मात्र, क्षणाचाही विलंब न करता चालकाने दुसऱ्या रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. ती रूग्णवाहिका आल्यानंतर त्यामध्ये यकृत ठेवण्यात आले. त्यानंतर सुरक्षितपणे यकृत पुण्याला पोहचून आवश्यक रुग्णावर त्याचे प्रत्यारोपन करण्यात आले.

सांगरुळ येथील राणी विलास मगदूम वय ४० या महिलेचे यकृत व किडनी दान करण्याचा निर्णय मगदूम परिवाराने घेतला. या अपघातात डॉक्टर आणि एक व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. यकृत व जखमींना नरेंद्र महाराज नाणीज यांच्या रुग्णवाहिकेतून रुबी हॉस्पिटलमध्ये सुरक्षित पोहोचविण्यात आले.

हे अवयव प्रत्यारोपणासाठी कोल्हापुरसह सोलापूर, पुणे येथील रुग्णालयाकडे पाठवले. या रुग्णावर उपचार करणारे डॉ. नाईक, डॉ. साईप्रसाद, डॉ. जोशी यांच्यासह विद्याकिय पथकाने परिश्रम घेतले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा