गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे दोन सख्या बहिणींचा अपघाती मृत्यु; ट्रकने दुचाकीला दीली धडक

दोन सख्या बहिणींचा अपघाती मृत्यु; ट्रकने दुचाकीला दीली धडक

पुणे, २०ऑगस्ट २०२२: पुणे-सोलापुर माहामार्गा वरील लोणी काळभोर येथे आज सकाळी मामाच्या गाडीवर बसून दोन सख्या बहिणी शाळेत जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. त्यात दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यु झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवडीपाठ परिसरात राहणारे पांडुरंग नवनाथ भिक्षे हे त्यांच्या भाची गायत्री नंदकुमार शितोळे वय १७ आणि राजश्री नंदकुमार शितोळे वय १० या दोघीनां घेऊन आज सकाळी शाळेमध्ये सोडण्यास निघाले होते.

त्यांची दुचाकी लोणी काळभोर स्टेशन चौक येथे आल्यावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पांडुरंग नवनाथ भिक्षे हे रस्त्याच्या कडेला पडले. तर दोघी बहिणींच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

ट्रक चालक काही अंतरावर जाउन ट्रक सोडून पळून गेला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version