एका ओपिनियन पोलनुसारच्या सर्वेक्षणानुसार, आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात भाजप-शिंदे सरकार येईल

मुंबई, १५ जून २०२३: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुका, विधानपरिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकाला आधारे, महाविकास आघाडी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढल्यास, शिंदे-फडणवीस सरकारचा पराभव निश्चित आहे. मात्र एका ओपिनियन पोलनुसारच्या सर्वेक्षणातून जे समोर आलय ते धक्कादायक आहे. या निवडणूक सर्वेक्षणानुसार, आजच्या घडीला जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन होईल.

ओपिनियन पोलनुसार विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १६५ ते १८५ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला ८८ ते ११८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. अपक्ष आणि इतरांना १२ ते २२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

या सर्वेक्षणानुसार उद्धव ठाकरे गटाला चांगलाच फटका बसत असून, भाजप-शिंदे यांच्या शिवसेनेला आरामात बहुमत मिळताना दिसतय. या ओपिनियन पोलचे आकलन जर योग्य ठरले तर महाविकास आघाडीचे भवितव्य संपणार आहे. मात्र, हा अहवाल प्रकाशित करताना संबंधित वृत्त संकेतस्थळाने सांगितले आहे की, त्यांचा हा अहवाल एका मत सर्वेक्षणावर आधारित आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा