गोल पोस्ट गुन्हा चोरी झालेल्या मोबाईल सहीत रक्कम जप्त करून आरोपीला अटक.

चोरी झालेल्या मोबाईल सहीत रक्कम जप्त करून आरोपीला अटक.

उस्मानाबाद, २४ जुलै २०२०: तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ फाट्यावरील आरोपी सचिन विरूनाथ शिंदे वय वर्ष २३ याला स्था.गु.शा.च्या पथकाने आज दिनांक २४ जुलै रोजी पकडले. पोलीस ठाणे गु. र. क्र. २५५/२०२० भा. दं. सं. कलम ३९४ या चोरीच्या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने २ सॅमसंगचे मोबाईल फोन तसेच २०००/- रूपये चोरी केले होते.

या गुन्ह्याच्या पद्धतीचा अभ्यास करून स्था. गु. शा. च्या पथकाने आज दिनांक २४ जुलै रोजी संबंधित आरोपी सचिन शिंदे याला त्याने चोरी केलेल्या वरील मालास जप्त करून पकडले. तसेच, पुढील कार्यवाही करिता त्याला पोलीस ठाणे तुळजापूर यांच्या ताब्यात दिले.

संबंधित गुन्ह्याची कारवाई सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने स्था. गु. शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड.

error: Content is protected !!
Exit mobile version