गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पॅरोल वर असणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या.

पॅरोल वर असणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या.

बीड, २६ जुलै २०२० : औरंगाबाद येथील जेलमध्ये शिक्षा भोगत असणारा भरत ताराचंद पवार हा आरोपी पॅरोल वर घरी आलेला होता. दोन दिवसांनंतर त्याची ही पॅरोल ची सुट्टी संपणार होती, आणि त्याला परत जेलमध्ये हजर व्हावे लागणार होते. मात्र, आज दुपारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

संबंधित आरोपी भरत ताराचंद पवार वय वर्ष २६,हा गेवराई तालुक्यातील जातेगाव गावखोरा तांडा येथील असून, तो त्याच्या पत्नीच्या खुनाची शिक्षा औरंगाबाद च्या जेलमध्ये भोगत होता. हार्सुल जेलमधून तो पॅरोल च्या सुट्टी वर एक महिन्यासाठी घरी आलेला होतात. त्याची ही सुट्टी दोन दिवसात संपणार होती, आणि त्याला परत जेलमध्ये हजर व्हावे लागणार होते. परंतु, त्याने आज दुपारी उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात तलवाडा पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलेला असून आता ठाण्याचे पी.आय उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड अमलदार खाडे हे या प्रकरणाबाबत पुढील तपास करत आहेत.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version