आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळाली: दुर्वास शेवाळे

इंदापूर, दि. ३० मे २०२०: इंदापूर येथील दुर्वास शेवाळे यांची हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना प्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना संघटनेच्या राज्य संयुक्त सरचिटणीस पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकताच त्यांनी इंदापूर येथील औद्योगिक वसाहतीमधील स्थानिक बेरोजगार तसेच स्थानिक कामगारांना कामांमध्ये सामाविष्ट करुन घ्यावे तसेच कोणालाही कामावरून कमी करण्यात येऊ नये यासाठी संबंधित औद्योगिक कारखान्यांना त्याबाबतचे पत्र दिले आहे. तसेच कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत असतात काही दिवसांपूर्वीच त्यांनी जर स्थानिक कामगारांना कामांमध्ये न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा देखील इशारा देखील दिला होता. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील काही कारखानदारांचे धागे दणाणले होते. उद्योजकांनि आपल्या कारखान्यात स्थानिक कामगारांना समाविष्ट करून घेतले आहे.

यावेळी आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळाली तसेच शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष वाढीसाठी कटिबद्ध राहील असे शेवाळे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा