नांदेड जिल्ह्यात अवैध मद्य विक्रेत्यांवर धडक कारवाई

7

नांदेड, दि.६ मे २०२० : मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन काळात अवैध मद्यविक्रीचे प्रमाण अधिक वाढल्याचे पहायला मिळते आहे. या अवैध मद्य विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धडक कारवाई सुरू करण्यात येत आहे. नांदेड परिसरात अशीच एक कारवाई करण्यात आली.

दि.४ मे रोजी मुदखेड तालुक्यातील पांडुरणा, चिकाळा तांडा, उमाटवाडी शिवार पुणेगाव व वाजेगाव परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ३२ आरोपींना अटक करून १४ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यविक्रेत्यांवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीलेश सांगडे यांनी विशेष पथकामार्फत धाडसत्र सुरू करण्यात आले आहे.

सोमवार दि.४ रोजी मुदखेड तालुक्यातील पांडुरणा, चिकाळा तांडा, उमाटवाडी शिवार पुणेगाव व वाजेगाव येथे धडक कारवाई करून २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये २१ वारस गुन्हे व ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ५९० लीटर हातभट्टी पकडून २० दुचाकी व एक चारचाकी वाहन पकडून एकूण १४ लाख २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

हि कारवाई निरीक्षक एस.एस.खंडेराय, निरीक्षक एस.एम.बोदमवाड, निरीक्षक पी.ए.मुळे, दुय्यम निरीक्षक टी.बी.शेख व बी.एस.मंडलवार यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन व पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी अभिनंदन केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा