मुंबई, ९ ऑगस्ट २०२२: पुणे मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असून या मार्गावरील साडेसहा हजार वाहनचालकांवर १७ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत महामार्गवरील पोलीसांनी विशेष कारवाई केली आहे.
मुंबई – पुणे मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून वेगमर्यादा व सीटबेल्टबाबत नियमांचे उल्लंघन होत आहे. या मार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या सर्वाधिक आहे. या मार्गावरील वेगमर्यादा निश्चित केली असून मार्गावरील घाटात वाहनांसाठी प्रतितास ५० तर अन्य ठिकाणी प्रतीतास १०० किलो मीटर वेगाने तर यापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही व स्पीडगनच्या मध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट, खालापूर टोल नाका, वडगाव येथे अतिवेगवान वाहने चालविताना निदर्शनास आले असून या ठिकाणी महामार्गवरील पोलीसांनी विशेष कारवाई केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ