गोल पोस्ट कृषी नगरमधील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकावर कारवाई; आयुक्तांकडून काढला पदभार

नगरमधील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकावर कारवाई; आयुक्तांकडून काढला पदभार

नगर, १ एप्रिल २०२३: कृषी केंद्र चालक, तसेच एका बियाणे कंपणीकडंही मागणी केल्याच्या तक्रारीवरून नगर कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किरणकुमार मांगडे यांचा पदभार काढण्यात आलाय. कृषी विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण यांनी आदेश दिले आहेत. नगर जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किरणकुमार मांगडे हे कृषी केंद्र चालकांकडून मागणी करीत असल्याच्या तक्रारी होत्या.

याबाबत त्यांची दक्षता विभागाकडून चौकशी झाली होती. यात तथ्य आढळल्यानं तसंच एका बियाणे कंपणीकडंही मांगडे यांनी मागणी केल्याची तक्रार कृषी विभागाला प्राप्त झाली होती. याबाबत मांगडे यांनी कोणताही खुलासा केलेला नव्हता. खरीप हंगामाच्या आढावा बैठकीतही ते अनुपस्थित होते. त्याचाही त्यांनी खुलासा केलेला नसल्याचं सांगण्यात आलंय.

या सर्व बाबींची चौकशी केली असता त्यात कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी मांगडे यांचा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पदांचा कारभार काढून घेतलाय. जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजीराव जगताप यांनी हा पदभार पारनेरच्या मंडळ अधिकारी यांच्याकडं सोपविण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version