कदमवाकवस्ती ग्रामपंचायतची मास्क न घालणाऱ्यावर कारवाई

कदमवाकवस्ती, दि. २ जुलै २०२०: येथे आज दि. २ जून २०२० रोजी पूर्व हवेलीतील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने आज वार गुरूवार दि. ३ जूलै पासून शनिवार पर्यंत तीन दिवस आरोग्य विषयक अत्यावश्यक सेवा व दुधव्यवसाय व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून बंदच्या पहिल्याच दिवशी मास्क न वापरता फिरणाऱ्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ४८ नागरिकांवर ग्रामपंचायत प्रशासन व लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा दणका दिला.

मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची आकारणी केली. त्यापैकी ३१ नागरिकांकडून दंड वसूल करून त्यांना समज देऊन सोडण्यात आले. तर उर्वरित १७ नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीन दिवसांच्या बंदला सर्व व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रसाशन व लोणी काळभोर पोलीस कारवाई करणार असल्याने नागरिकांनी मास्क वापरावेत व विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन लोणी काळभोर पोलिसांकडून व कदमवाकवस्ती ग्रामपंचायती कडून करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा