मुंबई, २९ जुलै २०२०: २०२० या वर्षाची सुरूवातच वाईट झाली. एका विषाणुने संपुर्ण जगाला वेठीस धरले. भारत ही त्यातीलच एक देश. भारताची चित्रपट सृष्टीवर देखील या वर्षात मोठ्या प्रमाणात अनेक वेळा शोककळा पसरली. चित्रपटसृष्टीतील ब-याच दिग्ग्जांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला. त्यातच आता बाॅलिवुड चित्रपटसृष्टीतील अॅक्शन दिग्दर्शक म्हणून नाव असलेल्या परवेज खान यांचे निधन झाले आहे.
बाॅलिवुडचे अॅक्शन दिग्दर्शक परवेज खान यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटकाने निधन झाले. वयाच्या ५५ व्या वर्षी परवेज यांनी जागाचा निरोप घेतला. रविवारी रात्री त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि सोमवारी सकाळी त्यांना मुंबईच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
१९८६ मधे ते बाॅलिवुड जगताशी जोडले गेले. परवेज खान यांनी अक्षय कुमार चा “खिलाड़ी”, शाहरुख खानचा “बाजीगर” आणि बॉबी देओल ची “सोल्जर” या चित्रपटात एक्शन दिग्दर्शक म्हणुन काम केले तर नंतर काही दिवसांनी त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्या बरोबर “अब तक छप्पन” मधे देखील काम केले आणि आयुष्मान खुरानाचा चित्रपट “अंधाधुन” आणि श्रीराम माधवनच्या “बदलापुर” मध्ये अॅक्शन डायरेक्टर काम म्हणुन काम केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी












































