बारामतीत बिगर मास्क सापडल्यास दंडात्मक कारवाई

बारामती, दि. २९ जून २०२०: बारामती शहरात रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न लावता फिरणार्‍यांवर बारामती नगर परिषद व पोलीस यांच्या संयुक्त पणे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.कारवाईत आज सोमवारी पहिल्याच दिवशी मास्क न वापरता फिरणाऱ्या ५३ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली यामध्ये १० हजार ६०० रुपयांचा एकूण दंड आकारण्यात आला आहे.

बारामती शहरात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नसताना अनेक दिवस बंद असलेल्या बाजारपेठांना नियम व अटीं लाऊन बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र अनेक जण बेजाबदार पणे वागत शहरात गर्दी करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी शासनाकडून वारंवार नागरिकांनी मास्क वापरावा असे आवाहन करण्यात येत आहे. तरी विना मास्क फिरणाऱ्यांंचीही वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे.पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.

बारामती शहरात कोरोना सदृश रुग्ण आढल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे ‘बारामती पॅटर्न’ राबवण्यात आला त्याला चांगले यश आले मात्र काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा लॉकडाउन सारखी परिस्थिती होऊ नये असे यासाठी मोहीम राबवत असल्याचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.

व्यापारी व नागरिकांकडून नियमांचे होतेय उल्लंघन

दुकानदारांकडून वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना फवारणी केली जात नाही तसेच ग्राहकांना हाताला लावायला सैनीटायझर दिले जात नाही अनेक ठिकाणी नागरिक मास्क  न लावता वस्तू खरेदीसाठी  दुकानात  गर्दी  करत तर सोशल डिस्टन्स पळाला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कोरोना संसर्ग संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा