लोणी काळभोर, दि,१७ मे २०२० : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि. १५ मे २०२० रोजी मध्यरात्री पेट्रोलिंग करीत असताना एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार (दि.१५) रोजी रात्री पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना माहिती मिळाली होती की, एक आरोपी या मार्गाने येणार आहे. त्यानुसार त्यांनी सापळा लावला. त्यानुसार एक जण येताना दिसला. पोलिसांनी त्या व्यक्तीची कसून चौकशी केली, मात्र तो बोलायला तयार नव्हता, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने सर्व कबुली दिली. त्याला घोरपडेवस्ती येथून ताब्यात घेण्यात आले.
फैजान शकील अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, तसेच त्याच्या जवळील एका पिशवी मध्ये असलेले दोन फूट लांबीची एक लोखंडी तलवार, व लाकडी मूठ असलेला एक लोखंडी कोयता, असा एकूण ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल व घातक अग्निशस्त्र जिवंत काडतुसे लोखंडी तलवार आणि कोयता असे स्थानिक गुन्हे शोध पथकाने जप्त केले.
पुढील तपासासाठी आरोपीला लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही ही हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत. असे “न्यूज अनकट” शी बोलताना पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, यांनी सांगितले आहे.
ही कामगिरी उपनिरीक्षक रामेश्वर तोडगे, अमोल गोरे, दत्तात्रय जगताप, रौफ इनामदार, मुकुंदा आयचीत, विजय कांचन, धीरज जाधव, अक्षय जावळे, यांच्या पथकाने कारवाई केली. व पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे