यवत पोलिस स्टेशन हद्दीत गावठी पिस्तुल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

यवत,२० नोव्हेंबर २०२० : यवत हद्दीत संशयितरित्या वावरणाऱ्या व्यक्तीबाबत गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी इम्रान बुऱ्हाण पिंजारी (रा. देहू रोड) अटक केल्यावर त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले.

आज यवत पोलिस स्टेशन हद्दीत पोलीस फरारी आरोपीचा शोध घेत असताना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहिती वरून यवत गावातील भुलेश्वर फाटा ,यवत ता. दौंड येथे एक व्यक्ती काळ्या रंगाच्या लाल पट्टे असलेली मोटार सायकल घेऊन वारंवार फिरत आहे.त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे समजले तसेच त्याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती मिळालेल्या माहितीवरून या ठिकाणी गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून संशयितरित्या वावरणाऱ्या व्यक्तीला गाडीसह ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी बनावटीचे पिस्तुल इम्रान बूरहान पिंजारी (वय २३ वर्षे रा आव्हाळ वाडी रोड वाघोली ता हवेली जि पुणे मूळ रा देगलूर नाका नांदेड जि नांदेड ) असे आरोपीचे नाव असुन भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीकडून
४०,००० रु किंमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल,
२०,०००रु किंमतीची एक काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली बजाज कंपनीची मोटार सायकल असा
एकूण ६०,००० किंमतीच्या मुद्देमाल ताब्यात
घेतला आहे. या कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे ,पो.हवालदार अनिल काळे,
रविराज कोकरे,काशीनाथ राजपुरे,विजय कांचन,अभिजित एकशिंगे,धिरज जाधव यांचा कारवाईमध्ये सहभागी होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा