साडेचार कोटींचा दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई

वडगाव, १९ सप्टेंबर २०२० : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोरगाव नीरा रोडवर दि. २४ जुन रोजी सिगारेट घेऊन जाणाऱ्या ट्रक वर दरोडा टाकुन ४.५० कोटी रुपयांचा कंटेनर लुटणा-या मध्यप्रदेशातील टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई केली आहे.आरोपीने महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील दरोडे टाकले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सविस्तर घटना अशी की वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मोरगाव – निरा रोडवरून दि २४ जून २०२० रोजी आयशर ट्रक नं ( एन एल ०१ एल ४३३९ ) रांजणगाव येथून निघालेल्या आय टी सी कंपनीची फिल्टर सिगारेट बॉक्स ४,६१,८८,८२०.०० रुपये (चार कोटी एकसष्ट लाख, अठठयाऐंशी हजार आठशे वीस) रू चा माल घेऊन ट्रक कर्नाटक हुबळी या ठिकाणी घेवुन जात असताना दुपारी २.०० वा सुमारास मोरगाव ता बारामती गावाच्या हद्दीत मोरगाव -निरा रोडवर १३ अनोळखी ईसमांनी ट्रकवर दरोडा टाकला होता.

घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंड यांच्या पथकाने वडगाव निंबाळकर पोलीसांनी या दरोडा प्रकरणातील गुन्ह्यातील कल्याणसिंग सदुलसिंग चौहान ( वय ४४ रा ओढ ता सोनकच जि देवास) ओमप्रकाश कृष्णा झाला (वय ३८ रा भैरवखेडी ता टोकखुर्द जि देवास ) दिनेश वासुदेव झाला (वय ५० रा टोककला ता टोंकखुर्द जि देवास ) सुशिल राजेंद्र झाला (वय ३७ रा टोककला ता टोंकखुर्द जि देवास ) मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया ( वय ४२ रा भैरवखेडी ता टोकखुर्द जि देवास ) सतिश अंतरसिह झांझा ( वय ४० रा ओढ ता सोनकच जि देवास ) मनोज केसरसिंग गुडेन ( वय ४० रा ओढ ता सोनकच जि देवास ) या आरोपींना अटक केली.

गुन्हयातील ३,८९३४७९२( तीन कोटी एकोणनव्वद लाख, चौतीस हजार सातशे ब्यान्नव) रुपायांचा माल ,दोन ट्रक आरोपींकडून जप्त करण्यात आला.आरोपींवर आधी महाराष्ट्र राज्यातील यवत, शिक्रापूर ,शनि शिंगणापुर पोलीस स्टेशच्या हद्दीत तसेच कर्नाटक , उत्तरप्रदेश पश्चिम बंगाल , ओरीसा, हरीयाणा राज्यात औषध ,सिगारेट च्या ट्रकवर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

वडगाव हद्दीतील दरोड्याचा तपास बारामतीचे उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत.आरोपींनी अनेक राज्यात दरोड्याचे गुन्हे केल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधिक्षक, संदीप पाटील अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, गणेश कवितके,विठठल कदम, भाउसाहेब मारकड, अमोल भुजबळ हे या तपास कामात सहभागी होते.

प्रभारी पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांनी सर्व टीमला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले
आहे. बारामती उपविभागात आत्तापर्यंत १६ टोळ्यांतील विरुद्ध १२२ आरोपी विरूध्द कारवाई करण्यात आली असुन या पैकी १०९ आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.बारामती पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा