धार्मिक तेढ व अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार

पिंपरी चिंचवड, दि. २ मे २०२० : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. सदर काळात काही समाज विघातक व गुन्हेगारी वृत्तीचे लोक, समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल असा संदेश अथवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा अफवा पसरवत आहेत. अशा व्यक्तींविरोधात आता गुन्हा दाखल होणार आहे.

कोरोना बाधित व्यक्तींची संख्या, त्यांच्यावरील उपचार व त्यात बळी पडलेल्या रुग्णांची संख्या तसेच या विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला परिसर वा संशयित कोरोना बाधित व्यक्ती यांबाबत, कोणतीही खातरजमा न करता काहीजण, माहिती किंवा बातमी, सोशल मिडीया द्वारे पसरवत आहेत . त्यामुळे समाजात अकारण भीती उत्पन्न होत असल्याचे जाणवत आहे.
अशा संदेश, अफवा किंवा बातमीमध्ये सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्याची क्षमता असल्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्याकरिता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. म्हणून संदीप बिष्णोई (पोलीस आयुक्त, पिंपरी चिचवड) तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा