राममंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवणा-यांवर करणार कारवाई :- अण्णासाहेब जाधव.

पुरंदर : दि.४ ऑगस्ट २०२० : अयोध्या येथील श्री.राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम उद्या बुधवारी ५ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अक्षेपार्ह मेसेज किंवा माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नये. दोन समाजात जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल होईल असे किंवा कोणतेही संदेश पसरवू नयेत अन्यथा अशाप्रकारचे संदेश पाठवणारे व ग्रुप ॲडमीन यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा भोर-पुरंदचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे. हे टाळण्यासाठी ग्रुप ॲडमीन यांनी फक्त ॲडमीन ग्रुप कंट्रोल करावे असे अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

उद्या बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथील श्री.राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत असल्याने कोणत्याही प्रकारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतील अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करू नये. तसेच सामाजिक तणाव वाढून प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही. याची काळजी घ्या. सर्व सूज्ञ नागरिक आहात आपण असे करणार नाही अशी आपल्याकडून अपेक्षा आहे.अशा स्वरूपाचे मेसेज आपल्याकडून सोशल मीडिया एसेमेस, व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यम दोन समाजात जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य किंवा चित्रफित इत्यादी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह प्रसारित करणार नाही, तसेच जातीय वैमनस्य, धार्मिक, समाजात तिरस्कार निर्माण करणारे कोणत्याही स्वरूपाच्या अनाधिकृत खोट्या बातम्या, कोणतीही व्यक्ती, समूह करणार नाही.याबाबत दक्षता घ्या.

अशा स्वरूपाचे मेसेज आपल्या सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व त्या ग्रुप ॲडमिनला उपविभागीय पोलीस अधिकारी कलम ३८ नुसार प्रतिबंध करीत आहे. असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय दंड संहिता कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी सर्व ग्रुप ॲडमिनने ताबडतोब आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना सूचना द्याव्यात. तसेच सेटिंगमध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे येणे सेटिंग करावे असे आवाहन पुरंदर भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा