अभिनेता अन्नू कपूर यांची झाली ऑनलाइन फसवणूक

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२२ : आरबीआयकडून वारंवार सांगितले जाते की सायबर क्राईम पासून सावध राहा पण अजूनही नागरिकांना याबाबत सतर्क राहण्याचे महत्त्व समजलेले दिसून येत नाही, ऑनलाईन माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीचे प्रमाणही सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर यांची नुकतीच इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली. या सायबर फ्रॉडमध्ये त्यांना तब्बल ४:३० वा लाखांचा गंडा घातला गेला आहे. बँक कर्मचारी असल्याच सांगत त्यांना फसवण्यात आले आहे.

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यामधून चार लाख तीन हजार रुपये काढून घेण्यात आले. गुन्हेगाराने एका खाजगी बँकेत काम करतो असं त्यांना सांगितलं. त्यानंतर अन्नू कपूर यांच्या जवळ बँकेची माहिती मागण्यात आली. तसेच वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपी शेअर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अन्नू कपूर यांनी ओटीपी शेअर केला, यानंतर काही वेळाने ठगांनी अनु कपूरच्या खात्यातून ४.३ लाख रुपये काढले आणि ते इतर दोन खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

दरम्यान अन्नू कपूर यांनी तत्काळ ओशिवरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. ज्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यात आले, त्या बँकेची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही खाती गोठवण्यात आली. आता याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा