गोल पोस्ट इतर अभिनेता रजत राजपूत यांनी घेतली राज्याचे राज्यपाल भगत कोशारी यांची भेट

अभिनेता रजत राजपूत यांनी घेतली राज्याचे राज्यपाल भगत कोशारी यांची भेट

मुंबई, ७ सप्टेंबर २०२२: अभिनेता रजत राजेश राजपूत यांनी महाराष्ट्रातील मॉडेलिंग आणि फिल्म इंडस्ट्रीत आपलं नाव कमावलं आहे आणि अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते रजत राजपूत आणि त्यांचा भाऊ चेतन राजेश राजपूत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची वैयक्तिक भेट घेतली.

मुंबई राजभवनात त्यांची भेट झाली. यावेळी राजपूत बंधूंनी राज्यपालांना पुष्पहार अर्पण केला आणि चित्रपटांच्या जीवनशैलीबद्दल बरीच चर्चा केली. राज्यपालांनी अभिनेता रजत राजपूत यांना कोणता चित्रपट पूर्ण झाला आहे आणि कोणता नवीन आगामी चित्रपट येत आहे हे विचारलं, तेव्हा राजपूत बंधूंनी येणाऱ्या आगामी चित्रपटाबद्दल त्यांना माहिती दिली.

राजपु यांनी सांगितलं की”सेकंड हँड” हा मराठी चित्रपट आगामी काळात येत आहे, त्यात अभिनेता सक्षम कुलकर्णी आणि अभिनेता रजत राजपूत दिसणार आहेत.
अभिनेता रजत राजपूत यांनी याआधी अनेक प्रसिद्ध राजकीय नेते, डॉ थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे राज्यपाल कृष्णचंद्र सिसोदिया, सामाजिक न्याय आणि कल्याण मंडळ सदस्य आणि पंतप्रधान सल्लागार नवी दिल्ली भारत यांची भेट घेतली होती.

न्यूज अनकटशी बोलताना राजपूत म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राज्यपालांसोबत झालेली भेट ही माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. यावेळी राज्यपाल कोषारी यांनी भावी वाटचालीसाठी मला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.”

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version