गोल पोस्ट स्पॉटलाइट अभिनेता, पटकथा लेखक शरीफ अन्सारी यांचे निधन

अभिनेता, पटकथा लेखक शरीफ अन्सारी यांचे निधन

मुंबई, दि.१२ मे २०२० : सोनी टिव्ही वरील क्राईम पेट्रोल कार्यक्रमात पोलिसांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि पटकथा लेखक शफीक अन्सारी (वय ५२) यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.

शफीक अन्सारी यांनी १९७४ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती . हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. शफीक अन्सारी यांनी बर्‍याच टिव्ही मालिकांमध्येही काम केले होते , परंतू ‘क्राईम पेट्रोल’ मालिकेतील पोलिसाच्या भूमिकेसाठी ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने टिव्ही क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version