मुंबई, १३ सप्टेंबर २०२२ : कोरोनाच्या काळात अभिनेता सोनू सूद लाखो लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरू ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या काळातच नाही, तर आजही तो लाखो गरिबांना मदत करतो.
सोनू आता विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना घेऊन आला आहे. सोनू सूद आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे.
त्याने त्याच्या ट्विटर हँडल वरून या संदर्भात पोस्ट केली आहे, या पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद ने लिहिले की, चला मिळून नवा भारत घडवूया. २०२२-२०२३ ची संभाव्य सुरुवात. परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग… त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं आहे, आयएएस ची तयारी करायची असेल तर आम्ही तुमची जबाबदारी घेऊ.
मोफत कोचिंग साठी विद्यार्थी सोनू सूद फाउंडेशन ग्रुपच्या दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी करू शकतात. याशिवाय नोंदणीसाठी फाउंडेशन ने ठरवून दिलेली पन्नास रुपये फी भरावी लागेल. या कोचिंग द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाईन आयएएस कोचिंग दिले जाईल. याशिवाय फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन च्या काळात त्यांनी मुंबईत अडकलेल्या असंख्य मजुरांची त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून सोनू चा उल्लेख देवदूत असा करू लागले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव