गोल पोस्ट स्पॉटलाइट अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, दिल्ली पोलिसांकडून ७ तास चौकशी

अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, दिल्ली पोलिसांकडून ७ तास चौकशी

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२२: सुकेश चंद्रशेखर २०० कोटी वसुली प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अभिनेत्री नोरा फतेहीची सुमारे काल ७ तास चौकशी केली आहे. दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यूने नोरा फतेहीची चौकशी केली. या प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्री रडारवर असून अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा सिलसिलाच लागला आहे. आता १२ सप्टेंबरला दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहेत.

सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूर सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होता असं ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या.पण नोरा फतेही ने स्वीकारल्या म्हणुन तिला चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शुक्रवारी दिल्लीतील मंदिर मार्गावरील त्यांच्या कार्यालयात चौकशी केली आहे. गुन्हेगार सुकेश चंद्रशेखरवर दाखल केलेल्या २०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुमारे सात तास चौकशी झाली. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग यांच्या पत्नीकडून २०० कोटी ची खंडणी घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यात नोरा फतेहीला समन्स बजावले आणि ती शुक्रवारी सकाळी तपास अधिकार्‍यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यासाठी हजर झाली होती. ती सकाळी ११ वाजता आली आणि संध्याकाळी ६ च्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडली.

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकणात सुकेश चंद्रशेखर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडले जात होते त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. या सगळ्या घडामोडी समोर आल्याने या प्रकरणात नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसला चौकशी साठी बोलावले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version