अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं फेसबुक पेज हॅक 

मुंबई, दि. २९ जुलै २०२०: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचं अधिकृत फेसबुक पेज आज हॅक झालं आहे. सोनालीने स्वतः इंस्टाग्रामवरून याबद्दल माहिती दिली आहे.  फेसबुक पेज हॅक झाल्यापासून या पेजवर आत्तापर्यंत अज्ञातांनी चार व्हिडिओज देखील पोस्ट केले आहेत.

लॉकडाऊनमुळे इंटरनेटचा वापर करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक लोक इंटरनेटद्वारे घरूनच काम करत आहेत. याचाच फायदा घेऊन काही अज्ञात लोक किंवा हॅकर्स हे इंटरनेटवर लोकांची फसवणूक करत आहेत. अनेकांचा डेटा, पासवर्ड आणि माहिती चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. एवढंच काय तर काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, बराक ओबामा, यांसह बिल गेट्स सारख्या शक्तिशाली लोकांचे देखील ट्विटर अकाउंट्स काही काळासाठी हॅक करण्यात आले होते. त्यामुळे इंटरेनेटवर कधीही आणि कुणाचेही अकाउंट हॅक होऊ शकते यात काही शंका नाही.

आज मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपलं फेसबुक पेज हॅक झालं असल्याची माहिती दिली. आपल्या इंस्टाग्राम स्टोरी मधून व्हिडिओ पोस्ट करत तिनेच ही माहिती दिली. सोबतच फेसबुककडे याबद्दल तक्रार केली असल्याचं तिने सांगितलं. तोपर्यंत त्या पेजवरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये असं आवाहन तिने केलं आहे. दरम्यान पेजवरून काही व्हिडिओज पोस्ट करण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत हे पेज रिकव्हर होत नाही तोपर्यंत त्या पेजवरील कोणत्याही मजकुरावर विश्वास ठेवू नये. आपणही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहणं गरजेचं आहे आणि योग्य ती काळजी घेऊनच सोशल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा