गोल पोस्ट स्पॉटलाइट अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारचा अपघात

अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारचा अपघात

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२३ : ‘बिग बॉस ६’ची विजेती, कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध सिरीयलमधील कोमोलिका म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. उर्वशी ढोलकिया शनिवारी या अपघतात थोडक्यात बचावली.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकिया तिच्या कारमधून मीरा रोड येथे फिल्म स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी निघाली होती. मात्र त्याचदरम्यान काशिमिरा येथे मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने उर्वशी ढोलकियाच्या कारला मागून धडक दिली. दरम्यान, स्कूल बस असल्याने विद्यार्थ्यांचा विचार करता उर्वशीने कोणतीही कायदेशीर तक्रार नोंदवलेली नाही.

तसेच या अपघातात उर्वशी ढोलकियाला गंभीर दुखापत झालेली नाही. पण डॉक्टरांनी तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. उर्वशीच्या अपघाताची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

उर्वशी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील मोठी अभिनेत्री असून, तिने कसौटी जिंदगी की, नागिन ६, कही तो होगा, देख भाई देख आणि ‘चंद्रकांता’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

error: Content is protected !!
Exit mobile version