अदा शर्माच्या ‘द केरला स्टोरी’ ने रचला इतिहास ९ दिवसांत केली १०० कोटींची कमाई

पुणे, १४ मे २०२३: अदा शर्माचा चित्रपट द केरला स्टोरीने देशावरच नव्हे तर जगावरही दबदबा निर्माण केला आहे. रिलीजच्या ९ दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. इतक्या कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटासाठी ही मोठी गोष्ट आहे. १०० कोटींचा टप्पा पार करणारा हा चित्रपट वर्षातील चौथा चित्रपट ठरला आहे. आठवड्याच्या दिवसात या चित्रपटाची दमदार कमाई सुरू राहिली आणि यामुळेच या चित्रपटाने रिलीजच्या ८ दिवसांत ९६ कोटींची कमाई केली होती. द केरला स्टोरी या चित्रपटाने रिलीजच्या ९ दिवसांत ११३ कोटींची कमाई केली आहे.

अदा शर्माच्या चित्रपटाचे बजेट फक्त ४० कोटी रुपये आहे, पण या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.०३ कोटींची कमाई केली होती, मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत असून वीकेंडला हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने आठवड्याभरात ५० कोटींचा टप्पा ओलांडला होता आणि आता शनिवारच्या कमाईसह चित्रपटाने १०० कोटींचा आकडाही गाठला आहे.

अदा शर्माने यात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो घोष यांनी केले आहे तर विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे, ते बॉलीवूड अभिनेत्री शेफाली शाहचे पती आहेत त्यांनी पूर्वी फोर्स हा देखील चित्रपट केला आहे. रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा