फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्रदान

फलटण, सातारा १८ सप्टेंबर २०२३ :
आज डिजिटल युगामुळे अनेक तरुण डिजिटल मीडिया त पदार्पण करत आहेत. डिजिटल मीडियात सातत्य टिकवणे काळाची गरज असून लोकशाहीची मूल्ये टिकवण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार समारंभाचे वितरण महाराजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, प्रल्हादराव साळुंखे पाटील, बाळासाहेब कासार, प्रमोद अण्णा निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, सई निंबाळकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर आणि माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार दिल्लीे एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम, विभागीय पुरस्कार दैनिक सांगोला चे संपादक सतीश सावंत यांना, तर जिल्हास्तरीय पुरस्कार दैनिक सकाळचे ढेबेवाडी प्रतिनिधी राजेश पाटील यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना नामदार श्रीमंत रामराजे म्हणाले की, माझा लढा हा पाणी प्रश्नावर होता आणि तो प्रश्न मी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. माझे आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनीही कोयने सारख्या प्रकल्पामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. तेथील लोकांना असणाऱ्या समस्या सोडवण्यामध्ये श्रीमंत मालोजीराजे महाराज साहेबांचा सिंहाचा वाटा होता, मी ही कायद्याचे शिक्षण घेणारा माणूस असून आज लोकशाही टिकवणे काळाची गरज आहे. लोकशाहीतील मूल्य रुजवणे हे महत्त्वाचे काम असून ते काम पत्रकारांनी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी आवर्जून त्यांनी केले.

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला अजितदादा पवार यांच्याकडे असणारे जलसंपदा खाते दिलं होतं, तो विश्वास टिकवत मी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम केले हे आपणा सर्वांना सर्व परिचितच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणासाठी गेल्या त्यांचं योग्य पुनर्वसन झाल्याचा मला आनंद असल्याचे मत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांनी आदर्श व उत्तम काम करणे काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील पत्रकार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर व कैलास श्रीमंत मालोजीराजे साहेब यांच्यामध्ये निवडणूक झाली होती. एकमेकांना मदत तर केलीच परंतु हरिभाऊ निंबाळकर यांना महाराज साहेबांनी मोठी मदत केली होती, तरीही महाराज साहेबांचा पराभव झाला ही पद्धत आजच्या पिढीला योग्य जनमानसात पोचवू शकते. त्यामुळे अशा परंपरेतून आम्ही आलो असल्याने, अशी परंपरा आजच्या काळात टिकवणे गरजेचे असल्याचेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

आज पत्रकारितेचे स्वरूप बदलत असून डिजिटल मीडिया अधिक गतीने प्रगती करताना दिसत आहे त्यामुळे आपण सर्वांनी नवनवीन तंत्रज्ञानाचाही अवलंब करणे गरजेचे आहे तसेच आज युट्युब च्या माध्यमातून आपणाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत असते. पत्रकारिता हा व्यवसाय म्हणून आज तरुणांना गरजेचे आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून आपण पत्रकारिता क्षेत्रांमध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे चॅनेल्स यूट्यूब वरती आपणाला पाहायला मिळत असल्याने युवकांनी डिजिटल मीडियामध्ये पदार्थ पदार्पण करणे गरजेचे असल्याचे, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सध्याची तरुण पिढी ही इंटरनेटची संबंधित असून पुढील पिढी ही कृत्रिम पिढी तयार होऊ शकते. जागतिक तापमान वाढ व कृत्रिम पिढी याबाबत आपण सर्वांनी चर्चा घडवणे गरजेचे आहे. चांगल्या गोष्टी या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बोलताना सांगितले.

यावेळी एबीपी माझाचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास फलटण तालुका व शहरातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागीय संपर्कप्रमुख श्रीरंग पवार यांनी केले तर स्वागत जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब मुळीक, सूर्यकांत निंबाळकर, शशिकांत सोनवलकर, तानाजी भंडलकर, अशोक सस्ते सचिनराजे निंबाळकर, संजय जामदार, वैभव गावडे यांच्यासह ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार फलटण तालुकाध्यक्ष सुभाष सोनलकर यांनीे मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका दीपाली निंबाळकर व निवेदक आनंद पवार यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, पत्रकार, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा