जनाई योजनेमध्ये सुपे दक्षिण भाग जोडा, शेतकऱ्यांची मागणी

बारामती, दि. २४ जून २०२० : बारामती सुपे भागाला वरदान ठरणाऱ्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या मायनर क्रमांक ६ च्या कामात सुप्याच्या दक्षिणबाजूचा भाग त्वरित जोडण्यात यावा. तसेच वितरण कुंडापासुन ते डाक बंगल्यापर्यंत बंद पाईपलाईनकरुन उर्वरीत गावे व वस्त्यांचा समावेश करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बारामती तालुक्यातील सुप्याच्या पश्चिमेकडे असलेल्या कालव्यातुन मायनर ६ च्या कामाचे दोन ते तीन वेळा सर्व्हेक्षण झालेले आहे. मात्र मायनर क्रमांक ६ च्या
कामात सुप्याचा दक्षिण भाग अद्याप जोडण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या भागातील
शेतकरी गेली १५ वषार्पासून जनाईच्या पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. यासंदर्भातील निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.

या मायनरवर दक्षिणेकडील सुमारे १६०० एकर क्षेत्र ओलिताखालील येवू शकते. यामध्ये पठारवस्ती, कुदळेवस्ती, बक्कलवस्ती, चोरामलेवस्ती,  गदादेवस्ती,
शेरेचीवाडी आणि बाबुर्डी आदी काही भाग येत आहे. मायनर क्रमांक ६ च्यासंदर्भात २ ते ३ वेळा सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर हा भाग अद्याप जोडण्यात आलेला नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य बी. के. हिरवे, माजी ग्रा. पं. सदस्य संजय दरेकर यांनी दिली.

दरम्यान चासकमान पाठबंधारे विभागाच्यावतीने मायनर क्रमांक ६ चे काम बंद पाईपद्वारे करण्यात येत आहे. याकामासाठी १ कोटी ६४ लाख १२ हजार १९२ ऐवढया रक्कमेस तांत्रिक मंजुरी मिळालेली होती. मात्र पुणे पाठबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी सदरचे अंदाजपत्रक सुधारीत करण्याकामी सुचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार सुधारीत अंदाजपत्रकानुसार १ कोटी ७४ लाख ८० हजार १४५ एवढी रक्कम मंजूर करून काम सुरु करण्यात आले आहे. मात्र या कामामध्ये गेली १५ वषार्पासुन वंचित असलेला भाग अद्याप समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा