ई-नाम पोर्टलशी ३८ नव्या बाजारपेठा जोडल्या

नवी दिल्ली, दि. १६ मे २०२०: भारतभरातील ३८ कृषी उत्पन्न  बाजारपेठा  ई-नाम पोर्टलशी आज जोडल्या गेल्या असून त्यायोगे एकूण ४१५ कृषीउत्पन्न बाजारपेठा जोडल्या जाण्याचा नियोजित टप्पा गाठला गेला आहे. यात मध्यप्रदेश (१९), तेलंगणा (१०), महाराष्ट्र (४), याबरोबर गुजरात, हरियाणा, पंजाब, केरळ आणि जम्मू काश्मिरमधील प्रत्येकी (१) अशा एकूण ३८ बाजारपेठांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात ५८५ आणि आता दुसऱ्या टप्प्यात नव्या ४१५ मंडया जोडल्या गेल्याने आता १८ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेश मिळून आता एकूण १००० बाजारपेठांचा या पोर्टलमध्ये समावेश झाला आहे .

ई-नाम पोर्टल हे छोट्या कृषीउत्पन्न व्यापारी संघटनानी ( एस एफ ए सी) अनुसरल्यामुळे तसेच त्याला सर्व राज्ये  आणि के़ंद्रशासित प्रदेशातील पणनमंडळे, बाजारपेठांतील सचिव, देखरेखतज्ञ, दर्जा मानक तज्ञ, वजन करणारे, सेवापुरवठादार, शेतकरी, व्यापाऱ्यांनी स्विकारल्यामु़ळे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाअंतर्गत येणारे सर्वात मोठे पोर्टल बनले आहे.

नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट (ई-नाम ) इलेक्ट्रॉनिक पोर्टलचे उद्‌घाटन १४ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते, वन नेशन वन  मार्केट असा कृषीमालाच्या विक्री साठी संपूर्ण देशभरात एकच  सामायिक मंच असावा या उद्देशाने याची स्थापना झाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा