पुणे, दि.७मे २०२० : पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ४८ वर्ष होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
साहेबराव गायकवाड यांची नियुक्ती, चार ते पाच महिन्यांपूर्वीच, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर ते पुण्यात काम करत होते. आज सकाळी घरी असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर










































