मुंबई, ३१ डिसेंबर २०२२ : गेटवे ऑफ इंडिया; तसेच ताज हॉटेल येथे नवीन वर्षाच्या उत्सवासाठी अभ्यागतांची मोठी गर्दी होऊ शकते, म्हणून मुंबई पोलिसांनी अनेक नियम जारी केले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक लोक गेटवे ऑफ इंडियावर जमतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी अनेक पावले आखली असून, अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी निर्णय घेतला आहे, की ३१ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून सुरक्षेच्या कारणास्तव दुपारी दोन वाजेनंतर कोणतीही बोट सोडणार नाही. मुंबई पोलिसांनीही नववर्षानिमित्त सीमेच्या सुरक्षेसाठी अनेक आदेश जारी केले आहेत. तत्पूर्वी, नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक उपाययोजना आणि मोहिमेची घोषणा केली.
संपूर्ण शहरात उत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्वसंध्येला अतिरिक्त फौजफाटा तैनात केला जाईल. नवीन वर्षाच्या उत्सवासाठीही नवी मुंबई पोलिसांची सुरक्षाव्यवस्था चोख असणार आहे. सुमारे ३००० ते ३५०० पोलिस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर तैनात असतील. सामान्य नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करू द्या; पण ते सुरक्षितपणे करा. मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नागरिकांनी रस्ता सुरक्षा आणि सुरक्षेशी तडजोड न करता आनंद घ्यावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले. लोकांना मद्यपान करून वाहन चालवू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड