सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकी दरम्यान सज्ज राहून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि आचारसंहितेचे पोलिसांनी पालन करावे, अशा सूचना अपर पोलिस अधीक्षक डॉ. सुनील लांजेवार यांनी संबंधितांना दिल्या. सोयगाव पोलिस ठाण्याची काल डॉ. लांजेवार यांनी वार्षिक तपासणी केली. यावेळी ते बोलत होते. वार्षिक तपासणीत पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांची उकल, दाखल गुन्हे, रजिस्टर तपासणी करण्यात आली असून यात हे ठाणे उत्तीर्ण ठरले असे त्यांनी सांगितले.
होळी, ईद आणि निवडणूक यासाठी कायदा व सुव्यवस्था ढासळणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना देत लोकसभा निवडणुकीनंतर सोयगाव ठाणे हे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होणार आहे, असे लांजेवार यांनी सांगितले. तसेच सहायक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांनी सोयगाव ठाण्याची माहिती डॉ. लांजेवार यांना दिली.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक सतीश बडे, उपनिरीक्षक रजाक हुसेन, दिलीप पवार, अजय कोळी, रवींद्र तायडे, राजू बर्डे, संजय सिंघम, गजानन दांडगे, शांताराम सपकाळ आदींसह कर्मचारी तसेच तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी