गोल पोस्ट इतर पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याची पुरेशी आवक : डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याची पुरेशी आवक : डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि.३० एप्रिल २०२० : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ३२ हजार ७९१ क्विंटल अन्नधान्याची तर ८ हजार ४९ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात २ हजार ४१८ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक १७ हजार ३५० क्विंटल इतकी झाली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात २९ एप्रिल २०२० रोजी ९८.४७ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.३९ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात ४३ हजार ८३५ स्थलांतरित मजुरांची सोय १ लाख १५ हजार ६३५ मजुरांना भोजन दिले गेले आहे. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत १५९ कॅम्प, कामगार विभागामार्फत ६८ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत २६० कॅम्प असे पुणे विभागात एकुण ४८७ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ४३ हजार ८३५ स्थलांतरित मजूर असून १ लाख १५ हजार ६३५ मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

error: Content is protected !!
Exit mobile version