गोल पोस्ट महाराष्ट्र सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकरांचा “पुनश्च: हारीॐ”…..

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकरांचा “पुनश्च: हारीॐ”…..

मुंबई, २५ जुलै २०२० : महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर यांची श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. जगभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील दादरमध्ये असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा कारभार पुढील तीन वर्षे बांदेकर पुन्हा सांभाळणार आहेत.

छोट्या पडद्यावर भाऊजी म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर गेली १६ वर्ष ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.

त्यामुळे प्रत्येक घरातील वहिनींचे ‘लाडके भाऊजी’ असे स्थान त्यांना मिळाले आहे. तसेच ते राजकारणामधे देखील सक्रीय असून शिवसेनेच्या बड्या नेत्यापैकी ते एक आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version