गोल पोस्ट महाराष्ट्र आदित्य शेंडे तहसीलदार तर वर्षा कोळेकर नायब तहसीलदार

आदित्य शेंडे तहसीलदार तर वर्षा कोळेकर नायब तहसीलदार

सोलापूर, दि. २२ जून २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून माढा तालुक्यातील निमगाव टें येथील आदित्य आजिनाथ शेंडे व बादलेवाडी येथील वर्षा नानासाहेब कोळेकर यांची अनुक्रमे तहसिलदार व नायब तहसीलदार पदी निवड झाली.

आदित्य शेंडे हे या परिक्षेत १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. आदित्य शेंडे यांचे शिक्षण बी. ई इलेक्ट्रॉनिक्स झाले असून त्यांचे वडील आजिनाथ शेंडे हे निवृत्त प्राथम‌िक शिक्षक तर आई सुरेखा शेंडे या प्राथमिक शिक्षिका आहेत. वर्षा नानासाहेब कोळेकर या परिक्षेत ६२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे शिक्षण बीटेक झाले असून वर्षा कोळेकर या मोलमजुरी करणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या यशाने आई तुळसाबाई व वडिल नानासाहेब यांच्या कष्टाचे चीज झाले. वर्षा कोळेकर यांना त्यांचे मामा आप्पासाहेब दत्तात्रय लट्टे यांनी शिक्षणासाठी मदत केली आहे.

या यशाबद्दल आमदार बबनदादा शिंदें, आमदार संजयमामा शिंदे, जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, विठ्ठल शुगरचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे यांनी अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version