आदित्य ठाकरे होणार मुख्यमंत्री?

मुंबई, दि. ३०एप्रिल २०२०: राज्यात सध्या कोरोनाचे मोठे संकट सुरू आहे. त्यात राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दहा हजारांच्या जवळपास पोहचली आहे. असे असताना महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अामदरकीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या संधीचा फायदा विरोधी पक्ष घेताना दिसत आहे. विरोधी पक्ष राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या परिस्थिती जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला तर त्यांच्या जागी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते.अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे यांच्या आमदारकीबाबत शिफारस केली होती. त्यामुळे राज्यपालांना मंत्रिमंडळाची शिफारस मान्यच करावी लागते. असे मत अनेक दिग्गज नेत्यांनी व्यक्त केले होते. या बाबत तज्ञांनीही आपले मत व्यक्त केले होते. राज्यपालांनी जर उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीला हिरवा कंदिल दिला तर तेच ते कायमस्वरूपी मुख्यमंत्री राहतील. जर असे झाले नाही तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
त्यात आदित्य ठाकरे यांना तात्पुरते मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईपर्यंत शिवसेनेची एक अट होती. ती म्हणजे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार. आता या तांत्रीक कचाट्यात शिवसेना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडणे कदापी शक्य नाही. तसेच आदित्य हे वरळी मतदार संघातून लोकनियुक्त आमदार आहेत. त्यांना आता पर्यावरण मंत्रीपदाचा अनुभव देखील आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी त्य‍ांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र अगदी शेवटचा पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

शेवटी राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा निर्णय जर फेटाळला तर पुन्हा शिफारस करता येते. मात्र याबाबत अजून तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडीची शिफारस अमान्य केलेली नाही. पुढील कायदेशीर लढाईच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने पुन्हा शिफारस करण्याची खेळी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत राजभवनकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता महाविकास आघाडीच्या शिफारशीचा राज्यपाल काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा