आदित्य ठाकरे यांनी शंभर कोटी घेतले ? रामदास कदम यांचा आरोप

पुणे १८ सप्टेंबर २०२२ : राज्यात सत्तातरानंतर एकनाथ शिंदे हे बंड करून मुख्यमंत्री झाले आणि विरोधी पक्षाकडून शिंदे गटावर वारंवार टीका करताना दिसत आहे. यादरम्यान शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला ५० खोके एकदम ओके म्हणत टीका केली . दरम्यान शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शंभर कोटी कुठून घ्यायचे हे त्यांना चांगलंच माहिती असे बोलत आदित्य ठाकरे संदर्भात मोठा गोप्यास्पोर्ट केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या दौऱ्यात त्यांनी शिंदे गटा वर हल्लाबोल केला होता याचं प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी खेडमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम बोलतात महाविकास आघाडी सरकार मध्ये आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे १०० कोटी रुपये घेतले असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी मी मागणी करणारे पत्र ही पाठवले आहे. असेही कदमांनी बोलले आहे.

तसेच रामदास कदम पुढे बोलले की शंभर खोके कुठे घ्यायचे हे त्यांना चांगलेच माहित आहे. आता कोकणात येऊन गद्दार आणि खोक्याची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सांगू नये अडीच वर्षात ते कधीही बाहेर पडले नाहीत बाप मुख्यमंत्री आणि बेटा मंत्री आणि नेता बाहेर. अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. सोबतच एका वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल असत तर सगळे आमदार तुमच्याकडे आले असते, उद्धव ठाकरे यांना मी तसा शब्दही दिला होता. पण मातोश्रीवर शरद पवार आले आणि उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला असा किस्साही रामदास कदम यांनी सांगितला आहे. आदित्य ठाकरे यांनी खरंच शंभर कोटी घेतले का हे रामदास कदम यांनी शिंदे यांना पाठवलेल्या पत्रामुळे चौकशी केल्याने स्पष्ट होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा