पुणे, २० सप्टेंबर २०२०: यूजीसी नेट प्रवेश पत्र २०२० साठीचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीएने २४ आणि २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रवेश परीक्षेचे कार्ड ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे. परीक्षेला बसणारे उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कार्ड डाउनलोड करू शकतात.
उमेदवार बराच काळ परीक्षेच्या अॅडमिट कार्डची वाट पाहत होते. परीक्षेचा दिवस जवळ येत असून परीक्षा हॉलचं तिकीट दिलं जात नसल्यानं उमेदवारांमध्ये ही परीक्षा पुढं ढकलल्याची भीती व्यक्त केली जात होती. पण, अखेर आता प्रवेशपत्र जारी केलं गेलंय. एनटीए परीक्षेसाठी कोविड -१९ साथीचा रोग टाळण्यासाठी विशेष उपाय केले जातील. त्याशिवाय केंद्र सरकारतर्फे एनईईटी आणि जेईई परीक्षांसाठी एसओपी मार्गदर्शक तत्त्वे आधीच जारी करण्यात आली आहेत. नेट परीक्षेच्या वेळीही ही मार्गदर्शक तत्त्वे अवलंबली जातील.
प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी या थेट दुव्यावर क्लिक करा:
https://testservices.nic.in/examsys/DownloadAdmitCard/LoginDOB.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFV/yIzhTZHBze3wooSg9DjivRoFAJf5QC0mmebIT92RT
यूजीसी नेट प्रवेश पत्र २०२०: कसं डाउनलोड करावं
यूजीसी नेट परीक्षा डाउनलोड करण्यासाठी अधिकृत साइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या. यानंतर, होम पेजवर उपलब्ध असलेल्या यूजीसी नेट अॅडमिट कार्ड २०१९ या लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल, जिथं उमेदवार लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करावं लागेल. नंतर सबमिट वर क्लिक करा. आपलं प्रवेश पत्र स्क्रीनवर प्रदर्शित केलं जाईल. प्रवेश पत्र तपासा आणि डाउनलोड करा. पुढील आवश्यकतांसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
यूजीसी नेट २०२० ची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. त्याचबरोबर ही परीक्षा १६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती, परंतु त्यानंतर एनटीए’नं परीक्षेच्या तारखा वाढवल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे