नवी दिल्ली, २ ऑगस्ट २०२०: रामजन्मभूमी चळवळीचे आर्किटेक्ट आणि देशातील पहिल्या राजकीय रथयात्रेचे नेतृत्व करणारे प्रमुख नायक, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ५ ऑगस्टला अयोध्या येथे राम मंदिराच्या भव्य भूमीपुजन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
श्री रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच लोकांसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, संघ प्रमुख मोहन भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्यासमवेत असणार आहेत. २०० पाहुण्यांची यादी सार्वजनिक केली गेली नाही. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे नाव श्री राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या आमंत्रण यादीमध्ये नाही.
रामजन्मभूमी चळवळीचे नेतृत्व करणा-या या दोन नेत्यांना मंदिर बांधण्याच्या वेळी आमंत्रित केले गेले नाही या गोष्टीवरून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतिहास साक्षीदार आहे की लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या रथयात्रेने राम मंदिर चळवळीला सर्वोच्च स्थान दिले होते. वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावरील बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. या चळवळीत असताना, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती, ज्या अडवाणींच्या तुलनेत कनिष्ठ आहेत आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री जयभानसिंग पवईया, जे विहिंपशी संबंधित आहेत, यांना आमंत्रण मिळाले आहे.
उमा भारती यांनी आमंत्रण स्विकारले
भूमिपूजनाला आलेल्या आमंत्रणाची पुष्टी देताना उमा भारती म्हणाल्या आहेत की त्या ४ ऑगस्टला अयोध्येत पोहोचतील व ६ ऑगस्टच्या सकाळपर्यंत त्या अयोध्येतच राहतील. याबाबत स्वत: उमा भारती यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
५ ऑगस्टला अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी लोकांना एकत्र जमण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जनतेने घरी बसूनच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी