कोरोनामुळे स्कूल बस चालकांची परवड

पुणे, ३१ जुलै २०२०: कोरोना सारख्या संसर्गजन्य आजार यामुळे गेली चार महिने झाले राज्यातील सर्व शाळा – कॉलेज बंद असल्यामुळे स्कूलबस चालकांना पुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यातच काही स्कूल बस चालकांनी तर शाळेच्या व कॉलेजच्या परवानगीने स्वतःचे बँक लोन करून खाजगी बसेस विकत घेतल्या आहेत.आणि अचानक लॉकडाऊनचे संकट ओढवले. यामुळे या बसेसचे बँकेचे हप्ते भरण्यासाठी सुद्धा त्यांच्या पैसे नाहीत.

बँक व फायनान्सनी हप्ते थांबवले आहेत परंतु त्यावरील व्याज माफी नाही असे ठणकावून सांगितले आहे. बसेस बंद असल्यामुळे गाडीचा मेंटेनन्स पण वाढला आहे. तो खर्च तर वेगळाच आहे तर काही बसेस स्कूलच्या व कॉलेजच्या आहेत गेली चार ते पाच महिने बसेस उभ्या आहेत त्यामुळे शिक्षण संस्थानी चालकांचे पगार बंद केले आहेत कारण अजूनही किती दिवस स्कूल कॉलेज बंद राहतील हे सांगता येत नाही. यामुळे तुमचे पगार आम्ही भागवू शकत नाही व तो खर्च आम्हाला झेपत नाही.

अशा अनेक संकटातून स्कूल बस ड्रायव्हर सध्या आर्थिक विवंचनेत सापडला आणि हा आकडा शंभरात,हजारात नसून लाखात आहे. आज आपण पाहतोच आहे की खाजगी शिक्षण संस्थांचे पेव फुटले आहे आणि प्रत्येक खाजगी स्कूल म्हटले की त्यांच्याकडे स्कूल बसेस असतातच शहरात तर एकेका शिक्षण संस्थेकडे ५० ते ६० बसेस सर्रास पाहायला मिळतात.परंतु एवढे मोठे संकट निर्माण होऊन देखील हा वर्ग आवाज उठवू शकत नाही कारण यांची अजूनही पाहिजे तेवढी संघटना संघटीत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा